S M L

प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल सिंग पोलिसांच्या ताब्यात

Sachin Salve | Updated On: Apr 2, 2016 07:02 PM IST

प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल सिंग पोलिसांच्या ताब्यात

मुंबई - 02 एप्रिल : 'बालिका वधू' या मालिकेतील मोठ्या आनंदीची भूमिका करणारी प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर राहुल सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या त्याची चौकशी करण्यात येत आहे.

प्रत्युषाने शुक्रवारी संध्याकाळी गोरेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊ जिवन यात्रा संपवली. प्रत्युषाने गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा प्रियकर राहुलनंच पाहिलं होतं. त्यानंच तिला कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तिथं तिला मृत घोषित करण्यात आलं. राहुलशी पैशांवरून भांडण झाल्यानंतरच प्रत्युषानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. 'पॉवर कपल' शो मध्ये राहुल आणि प्रत्युषा या दोघांनाही घसघशीत मानधन मिळालं होतं. पण राहुलला न सांगता प्रत्युषानं पैसे काढून घेतले आणि त्यावरून या दोघांचं भांडण झालं होतं.


दरम्यान, प्रत्युषाचे कुटुंबीय आल्यानंतरच तिचं पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्युषाची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. तर तिचा प्रियकर राहुललाही हॉस्पिटलमध्ये आणण्यात आल्याची माहिती आहे.

तर अभिनेत्री पूजा बोस ही प्रत्युषाच्या काही जवळच्या मैत्रिणींपैकी एक आहे. आपल्या मैत्रिणीच्या आत्महत्येचं गुढ काय आहे याची उकल झालीच पाहिजे असं पूजानं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2016 01:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close