News18 Lokmat

‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2016 10:52 PM IST

‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या

441147-pratyusha

मुंबई – 01 एप्रिल : 'बालिका वधू' फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या गोरेगावमधील राहत्या घरी संध्याकाळी पाचच्या सुमारास गळफास लावून तिने आत्महत्या केल्याचे कळतंय. तसंच, आत्महत्याचे कारण अद्याप कळलेले नाही.

त्यानंतर तिचा मृतदेह अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांमुळे ती डिप्रेशनमध्ये होती. त्यातूनच प्रत्युषाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जानेवारी महिन्यात प्रत्युषाने तिच्या राहत्या घरी पोलीस जबरदस्तीने घुसल्याची तक्रार नोंदवली होती. तसंच त्यांनी आपला विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटलं होतं.

कलर्स चॅनलवरील 'बालिका वधू मालिकेतील आनंदीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर 'झलक दिखला जा'च्या पाचव्या आणि 'बिग बॉस'च्या सातव्या सीझनची ती स्पर्धक होती. ती सध्या तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहसोबत 'पॉवर कपल' नावाचा रिऍलिटी शो करत होती.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2016 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...