देशाचा मध्यबिंदू असलेल्या ऐतिहासिक झीरो माईल स्तंभाला तडे

देशाचा मध्यबिंदू असलेल्या ऐतिहासिक झीरो माईल स्तंभाला तडे

  • Share this:

Nagpur Tade

नागपुर - 01 एप्रिल :  देशाचा मध्यबिंदू असल्यामुळे ऐतिहासिक ठेवा असलेल्या झीरो माईलच्या स्तंभाला तडे गेलेत, त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण देशाचा भौगोलिक मध्यबिंदू शोधून इंग्रजांनी नागपुरात झीरो माईलचा स्तंभ उभारला होता. याच झीरो माईलपासून शहरा शहरांमधील अंतर माईल्समध्ये मोजण्यात आली. या ठिकाणाचं महत्त्व कळावं म्हणून इंग्रजांकडून हा स्तंभ उभारण्यात आला.

गेल्या अनेक वर्षात भकास स्थितीत असलेल्या झीरो माईलच्या स्तंभाला आता भेगा पडल्या आहेत. तसचं यातले दगड तुटत चालल्याने ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सी पी ऍन्ड बेरार या राज्याची राजधानी असताना नागपूरमध्य भागात असल्यामुळे इंग्रजांनी झीरो माईल नागपुरात उभारला. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरलेल्या या वास्तूचं जतन व्हावं असं पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे. पण पुरातत्व विभागाकडे झीरो माईलचा ताबा नसल्यामुळे त्याचे संरक्षण करता येत नसल्याचे पुरातत्व विभागानं स्पष्ट केलं आहे. तर शहरातील पुरातन वास्तूंचं जतन करण्याची जबाबदारी हेरिटेज कंझर्वेशन कमिटीकडे आहे. पण या कमिटीतील सदस्यांचा पायपोस कुणाचा कुणात नाही. नागपुरात येणार्‍या देश परदेशातले पर्यटक झीरो माईल पाहण्यासाठी येतात. झीरो माईलची अशी अवस्था पाहून नागपूर बद्दल चुकीचा संदेश जाऊ शकतो याची कल्पनाही स्मार्ट सीटी करू पाहणार्‍या नागपूरच्या प्रशासनाला नाही हे दुर्देव आहे.

नागपूरची शान : झीरो माईल

- 1907 : ब्रिटिशांनी केली झीरो माईलची स्थापना

- घोड्यांच्या पावलांचा अंतर मोजण्यासाठी वापर

- देशभरातल्या शहरांमधली अंतरं माईल्समध्ये ठरवण्यात आली

- पुरातत्व खात्याच्या यादीत असूनही त्याचा ताबा या विभागाकडे नाही

- ताबा नागपूर सुधार प्रन्यासकडे (NIT)

- NIT कडून झीरो माईल वर्षानुवर्षं दुर्लक्षित

- पुरातत्व विभागाच्या निकषांनुसार रासायनिक प्रक्रिया नाही

- 10 वर्षांपूर्वी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली फक्त अतिरिक्त बांधकाम

- 2004 : झीरो माईललगतचा पेट्रोलपंप श्रीकांत जिचकारांच्या प्रयत्नांनंतर हटवला

- पेट्रोलपंपाच्या जागेवर सध्या पार्किंग

- झीरो माईलजवळ गर्दुल्ले, भिकार्‍यांचा वावर

- देश परदेशांतल्या पर्यटकांसमोर नागपूरची प्रतिमा खराब

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 1, 2016, 2:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading