नवी ओळख, कांदा तर लासलगावचा आणि गुळ तर कोल्हापूरचा !

नवी ओळख, कांदा तर लासलगावचा आणि गुळ तर कोल्हापूरचा !

  • Share this:

lasalgaon_kaju01 एप्रिल : संत्रा म्हटल्यावर नागपूरची आणि द्राक्ष म्हटल्यावर नाशिकचं नाव आपसूक तोंडी येतं. आता या उत्पादनांना जिल्ह्यानुसार ओळख मिळणार आहे. यामध्ये लासलगावचा कांदा आणि वेगुर्ल्याचे काजू अशी ओळख मिळणार आहे.

राज्यातील काही महत्वाच्या शेती पीकांना आता त्या त्या भागातली पीकं म्हणून अशी स्वतःची अशी एक भौगोलिक ओळख मिळणार आहे. उदाहरणार्थ लासलगावचा कांदा, वेगुर्ल्याचे काजू, मंगळवेढ्याची ज्वारी, नवापूरची तूर, आजरा (कोल्हापूर) - घनसाळ भात, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी -कोकम या उत्पादनांना जिल्ह्यानुसार ओळखलं जाणार आहे. राज्यातील इतर 7 ठिकाणांनाही उत्पादनांवरून भौगोलिक ओळख मिळणार आहे. यामध्ये कोल्हापुरी - गुळ, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरिज, नाशिकची द्राक्षं, जळगावची वांगी आणि नागपूरची संत्रे यांचा समावेश आहे.

उत्पादनांना भौगोलिक ओळख

लासलगाव - कांदा

मंगळवेढा - ज्वारी

वेंगुर्ला - काजू

नवापूर - तूर

नाशिक - द्राक्षं

जळगाव - वांगी

नागपूर - संत्री

महाबळेश्वर - स्ट्रॉबेरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग - कोकम

वाघ्या - घेवडा

आजरा - घनसाळ भात

कोल्हापूर - गूळ

कोल्हापूर - चप्पल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2016 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading