उदयनराजे भोसलेंनी घेतली बिग बींची भेट

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2016 08:43 PM IST

उदयनराजे भोसलेंनी घेतली बिग बींची भेट

[wzslider autoplay="true"]

मुंबई – 31 मार्च : सातार्‍याच्या छत्रपती राज घराण्याकडून दिला जाणारा शिवसन्मान पुरस्कार यंदा चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना या पुरस्कारासाठी निमंत्रण दिलं.

यावेळी एकाच स्फटिकाच्या दगडात कोरलेली तलवार अमिताभ बच्चन यांना भेट दिली. या तलवारीचं अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलं. यावेळी उदयनराजेंनी महानायकासोबत फोटोसेशनही केलं.

'शिवसन्मान पुरस्कारा'चं निमंत्रण अमिताभ बच्चन यांनी स्वीकारलं आहे. मात्र, मे महिन्यात सातार्‍यात हा पुरस्कार सोहळा असल्यामुळे आता तारीख सांगू शकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आपल्याला आदर आहे आणि यांच्या वंशजांनी मला येऊन भेटल्याचा अभिमान वाटतो आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2016 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...