उद्धव ठाकरेंच्या भाग्यात आहे का राजयोग? अशी आहे त्यांची कुंडली

उद्धव ठाकरेंच्या भाग्यात आहे का राजयोग? अशी आहे त्यांची कुंडली

आजतक या वृत्तपत्राने ज्योतिषाचार्य डॉ. अरुणेश कुमार शर्मा यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीविषयी चर्चा केली.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर :  भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी एकत्र येत महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्नही उद्ध्वस्त झालं. या सगळ्यावर आजतक या वृत्तपत्राने ज्योतिषाचार्य डॉ. अरुणेश कुमार शर्मा यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीविषयी चर्चा केली. जाणून घेऊयात उद्धव ठाकरेंच्या 'राजयोग' विषयी काय आहे त्यांची कुंडली.

उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी झाला. त्यांचा जन्म मुंबईत 10:14 वाजता झाला अशी माहिती आहे. उद्धव ठाकरेंची कन्या ही रास आहे. कन्या रास असल्यामुळे उद्धव ठाकरेंचा गुरु योग ठिक नाही आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये गुरूचा दोष आहे. त्यामुळे कायम त्यांच्या राजकीय करिअरमध्ये उलथा-पालथ सुरू असते.

इतकंच नाही, त्यांचा गुरू चौथ्या स्थानावर आहे. जे कन्या राशीसाठी शुभ मानलं जात नाही. त्यामुळे ठाकरे यांच्या आयुष्यात याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो. या गुरूची महादशा 2028 पर्यंत राहणार असल्याचं अरुणेश कुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुढच्या एक दशकापर्यंत त्यांच्या आयुष्यातील संकटं कमी होणार नाहीत.

या महादशामुळे उद्धव ठाकरे यांना स्थानिक जनसमर्थन नक्की मिळणार, पण सत्तेत मोठा जागा मिळणं जरा कठीण आहे. अरुणेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2028 नंतर उद्धव ठाकरे यांच्या राशीत शनिची महादशा सुरू होणार आहे. ही महादशा उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात शुभ संकेत घेऊन येऊ शकते.

या सगळ्यामध्ये जास्त काळापर्यंत उद्धव ठाकरे राजकारणात खंबीर राहतील. पण मोठा डाव साधण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल असं ज्योतीषाचार्य अरुणेश कुमार म्हणाले.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 23, 2019, 6:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading