Elec-widget

मटकाचालकांशी हातमिळवणी करणारे पोलीस निलंबित

18 मार्च मटकाचालक आणि जुगार अड्डा मालकांशी हातमिळवणी करणारे कोल्हापुरातले करवीर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कॉन्टेबल निलंबित झाले आहेत. श्रीकांत खपले आणि प्रकाश मांडवकर अशी या पोलिसांची नावे आहेत. ग्रामीण डीवायएसपी भारत कांगडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समितीही नियुक्त करण्यात आली आहे. 'आयबीएन-लोकमत'ने याबाबतचे वृत्त दाखवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापुरात अगदी मोक्याच्या ठिकाणावर हा मटका खेळला जात होता. कल्याण, मुंबई मटक्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत होती. गृहमंत्री आर. आर. पाटील कोल्हापूर दौर्‍यावर आले असताना त्यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती.पण पोलिसांच्याच मदतीने हे अवैध धंदे सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनाही माहीत नसेल. मटकाचालकांवरील कारवाई थांबविण्यासाठी या पोलिसांनी 25 हजारांची मागणी केली होती.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2010 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...