कोण गाठणार सेमीफायनल ? आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 'रण'संग्राम

कोण गाठणार सेमीफायनल ? आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 'रण'संग्राम

  • Share this:

indvsaus43मोहाली - 26 मार्च : टी 20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध थरारक विजय मिळवल्यानंतर आज टीम इंडिया मोहालीत ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यास सज्ज झालीय. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करावं लागणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कायमच चुरशीचा आणि रंगतदार ठरतो. भारतातील मैदानांवर टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाविरोधातील कामगिरी नेहमीच सर्वोत्कृष्ट ठरली आहे. आतापर्यंत भारतीय मैदानावर टीम इंडिया दोन वेळा ऑस्ट्रेलियाविरोधात खेळली.

दोन्ही वेळा टीम इंडियानेच विजयी झेंडा फडकावला. जर भारतानं ही मॅच जिंकली तर भारताचे 6 पॉईंटस होतील आणि टीम इंडिया सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे आणि टीम इंडिया हे करून दाखवणारच, अशी आशा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीला वाटतेय.

आज संध्याकाळी 7.30 वाजता ही मॅच रंगणार असून आज रविवार असल्यानं बहुतांश क्रिकेटप्रेमी टीव्ही समोर असणार आहे. बांगलादेशविरुद्धची अटीतटीची मॅच भारतानं शेवटच्या बॉलवर जिंकली होती, त्यामुळे आजची मॅचही तशीच अटीतटीची होईल अशी चाहत्यांची अपेक्षा असेल.

भारत X ऑस्ट्रेलिया - टी-20ची कामगिरी

- दोन्ही संघ आतापर्यंत 12 वेळा आमने-सामने आले आहेत

- 8 वेळा भारताचा तर 4 वेळा ऑस्ट्रेलियाचा विजय झालाय

- जानेवारीमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर ऑस्ट्रेलियात 3-0 नं विजय

- भारतात दोन्ही संघांनी आतापर्यंत 2 मॅचेस खेळल्यात

- दोन्ही मॅचमध्ये भारताचाच विजय झालाय

- 20 ऑक्टोबर 2007 ला मुंबईत भारताचा 7 विकेट्सनं विजय

- 10 ऑक्टोबर 2013 ला राजकोटमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनं मात केली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 27, 2016, 2:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading