S M L

सहकारी बँक बुडवणार्‍या नेत्यांविरोधात गुन्हे दाखल होईल -चंद्रकांत पाटील

Sachin Salve | Updated On: Mar 27, 2016 02:07 PM IST

FMNAIMAGE31440Kolhapur_Chandrakant Patilउस्मानाबाद - 27 मार्च : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडवणार्‍या राजकीय पुढार्‍यांविरोधात गुन्हे दाखल केला जाईल, असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे तुळजापूरचे आमदार मधुकर चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार राणा पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्थानिक नेत्यांवर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळाल्याचं मानलं जातंय. यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते अडचणीत येणार आहेत.

जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार याबँकेला मदत करण्यासंदर्भात बैठक घेणार असून या बँकेतून सहकारी साखर कारखान्यांना अपुर्‍या तारणावर जी मोठी कर्जे दिली त्यांच्यावर सहकार कलम 88 नुसार कारवाई चालू केली आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील तुळजापूर तालुक्यात दुष्काळ पाहणी करण्यासाठी आले असता बोलत होते. तसंच अवैध सावकारी प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी प्राधिकरण स्थापन करून फास्ट ट्रॅक कोर्टात सावकारी प्रकरणे निकाली काढणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2016 02:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close