मुंबई – 26 मार्च : बाळासाहेब ठाकरे यांना हाफिज सईदला धडा शिकवायचा होता. म्हणून यासाठी शिवसेना भवन आणि मातोश्रीची रेकी केली होती, असा गौप्यस्फोट 26/11 चा मुख्य आरोपी डेव्हिड हेडली याने केला आहे.
डेव्हिड हेडलीची टेलिकॉन्फरन्सद्वारे उलट तपासणीचा आज तिसरा दिवस होता. या तपासणीत त्याने अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.
दहशतवादी संघटना जमात उद् दावाचा म्होरक्या हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता. त्यासाठी मी 6 महिन्यात काम पूर्ण करेन असं आश्वासन हाफिजला दिलं होतं. धडा शिकविण्यासाठी मी शिवसेना भवन आणि बाळासाहेबांचे निवासस्थान मातोश्रीचीही रेकी केली होती. याचे व्हिडिओ क्लिप बनवून अभ्यास करण्यात आला. तसंच मातोश्रीच्या काही सुरक्षा रक्षकांचीही भेट घेतली होती, असा दावा हेडलीने केली आहे. त्याचबरोबर, दहशतवाद्यांनी तन्ना हाऊसचीही रेकी केल्याची धक्कादायक माहिती हेडलीने दिली आहे. तन्ना हाऊस हे दक्षीण मुंबईतील उच्चब्रू कुलाबा परिसरातील सीबीआयचं कार्यालय आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv