आव्हाडांवर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला -सुप्रिया सुळे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2016 11:48 AM IST

24 मार्च : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. जितेंद्र आव्हाडांवर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर दिली.`1supriya_sule

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अभाविप आणि आंबेडकरवादी चळवळीच्या विद्यार्थ्यांमध्ये घोषणायुद्ध झालं होतं. विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड फर्ग्युसन महाविद्यालयात गेल होते. तेव्हा भाजयुमो आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी 'आव्हाड गो बॅक'च्या घोषणा देत त्यांना धक्काबुक्की केली. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीतर त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. वाद इतका चिघळला होता की पोलिसांना आव्हाडांच्या सुरक्षेसाठी पिस्तुल काढावे लागले. या प्रकारमुळे आव्हाडांना महाविद्यालयातून बाहेर पडावं लागलं.

राष्ट्रवादीने या प्रकरणाचा तीव्र निषेध केलाय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. आव्हाडांवर झालेला हा हल्ला आपल्या लोकशाही आणि स्वातंत्र्यावर हल्ला आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2016 11:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...