मुंबई - 24 मार्च : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने प्रयत्न केला होता असा गौप्यस्फोट 26/11 हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीने केलाय. एवढंच नाहीतर बाळासाहेबांवर हल्ला करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवलंही होतं पण तो पकडला गेला असा खुलासाही हेडलीने केला.
डेव्हिड हेडलीची अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबई मोक्का कोर्टात उलट तपासणी सुरू आहे. दहशतवादी अबू जुदालचे वकिल हेडलीची उलटतपासणी करत आहे. आज पुन्हा एकदा हेडलीने बाळासाहेबांवर हल्ल्याचा पुन्हा उल्लेख केलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लष्कर ए तोयबाने हल्ला केल्याचा कट रचला होता. यासाठी बाळासाहेबांवर हल्ला करण्यासाठी एका दहशतवाद्याला पाठवण्यात आलं होतं पण तो पोलिसांच्या ताब्यात लागला असा गौप्यस्फोट हेडलीने केलाय. एवढंच नाहीतर पकडला गेलेला संशयित हल्लेखोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला असा खुलासाही हेडलीने केलाय. याआधीही तपासणीत हेडलीने बाळासाहेब ठाकरे लष्कर ए तोयबाच्या हिटलिस्टरवर होते. आणि यासाठी शिवसेना भवनाची दोन वेळा रेकी केली होती असा खुलासा केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv