S M L

स्वतंत्र मराठवाड्यावरुन शिवसेना-भाजपात राडा

Samruddha Bhambure | Updated On: Mar 22, 2016 11:39 PM IST

स्वतंत्र मराठवाड्यावरुन शिवसेना-भाजपात राडा

22 मार्च : स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावरुन भाजप आणि शिवसेनेत रण पेटले असून त्याचे पडसाद आज (मंगळवारी) नाशिकमध्येही पाहायला मिळाले. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या महिला मेळाव्यात धुडगूस घालत तोडफोड केली आहे.

महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भापाठोपाठ स्वतंत्र मराठवाडा हवा असे विधान केल्यानंतर वातावरण तापले असताना, नाशिकमध्ये आलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना मराठवाडा स्वतंत्र व्हावा ही जूनीच मागणी असल्याचे सांगितलं. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी गोंधळ घातला.


नाशिक- पुणे रोडवर एका महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांनी कार्यक्रमात घुसून धुडगूस घातला. तसेच, या कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खुर्च्या उलटून टाकत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर वातावरण तणावाचे निर्माण झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2016 11:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close