वारिस पठाण यांच्या निलंबनाच्या कारवाईला पाठिंबा देणे ही काँग्रेसची चूक - दलवाई

वारिस पठाण यांच्या निलंबनाच्या कारवाईला पाठिंबा देणे ही काँग्रेसची चूक - दलवाई

  • Share this:

husain_dalwaiसोलापूर - 21 मार्च : 'भारत माता की जय' अशी घोषणा देण्यास नकार देणार्‍या एमआयएम आमदार वारिस पठाण यांच्यावरील कारवाईला पाठिंबा देणे ही काँग्रेसची चूक असल्याचे सांगत काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी पक्षाला घरचा अहेर दिलाय.

'विधिमंडळाच्या कामकाजात सभापतींनी कायदा लक्षात घेणं गरजेचं होतं. एखाद्या आमदारावर अशी जबरदस्ती करणे चुकीचं असल्याचं मत हुसेन दलवाई यांनी व्यक्त केलं. पण, त्याचवेळी एखद्या आमदाराने 'भारत माता की जय' न म्हणणं गैर असल्याचं सांगत त्यांनी सारवासारव केली. यावेळी त्यांनी भाजप आणि एमआयएम यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही केला. मागील आठवड्यात विधानसभेत भाजपचे आमदार राम कदम यांनी 'भारत माता की जय' मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी वारीस पठाण यांच्याकडे पाहुन भारत माता की जय अशी घोषणा दिली. पण, वारिस पठाण यांनी आपण भारत माता की जय म्हणणार नाही असं भर सभेत सांगितलं. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. सर्वपक्षीय आमदारांनी वारिस पठाण यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानुसार वारिस पठाण यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2016 09:21 AM IST

ताज्या बातम्या