... आणि विराट मास्टर ब्लास्टरसमोर झाला नतमस्तक!

... आणि विराट  मास्टर ब्लास्टरसमोर झाला नतमस्तक!

  • Share this:

V

कोलकाता - 20 मार्च : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताच्या या धडाकेबाज विजयाचा शिल्पकार ठरला, विराट कोहली. अफलातून अर्धशतकी खेळी साकारून त्यानं पाकिस्तानचं स्वप्न उद्‌ध्वस्त करून टाकलं आणि भारतीयांना जल्लोषाचा आणखी एक 'मौका' दिला. कोहलीच्या या संस्मरणीय खेळीचं क्रिकेटविश्वात भरभरून कौतुक होतंयच, पण अर्धशतकानंतर एका स्टँडकडे पाहत वाकून केलेल्या वंदनामुळे त्याची उंची अधिकच वाढली आहे.

शाहीद आफ्रिदीच्या चेंडूवर कव्हर ड्राइव्हचा फटका खेळून एक धाव घेत विराटनं अर्धशतक पूर्ण केलं आणि ईडन गार्डन्सवर जमलेले 67 हजार प्रेक्षक उसळलेच. या प्रेक्षकांना आणि टीव्हीसमोर बसलेल्या तमाम देशवासियांना विराटनं बॅट उंचावून अभिवादन केलं. त्यानंतर, व्हीआयपी स्टँडकडे पाहत, दोन्ही हात समोर करून तो नतमस्तक झाला. त्याचं हे वंदन नेमकं कुणासाठी हे तेव्हा कळलं नाही. अर्थात, विराट सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानत असल्यानं, त्याच्यासाठीच हा सलाम असेल, असा अंदाज समालोचक व्हीव्हीएस लक्ष्मणने वर्तवला होता. त्याला विराटनं सामन्यानंतर दुजोरा दिला.

सचिन तेंडुलकरला पाहत मी लहानाचा मोठा झालो आणि आज त्यांच्यासमोर विजयी खेळी केल्याचा आनंद अवर्णनीय आहे, असं विराट सामना झाल्यानंतर म्हणाला.

दरम्यान, विराटनं दिलेल्या या सन्मानाबद्दल सचिननं त्याचे आभार मानलेत. टीम इंडियानं विजयी होऊन परतताना माझ्याकडे पाहून हात उंचावल्यानं, मी संघातून कधीच बाहेर पडलो नसल्यासारखंच वाटलं, अशा भावना सचिननं ट्विटरवरून व्यक्त केल्या. त्यामुळे सचिन-विराटमधील नातं अधिकच घट्ट झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 20, 2016, 6:09 PM IST

ताज्या बातम्या