LIVE : भारत-पाकिस्तान महामुकाबला स्कोअर अपडेट्स

Sachin Salve | Updated On: Mar 19, 2016 10:12 PM IST

LIVE : भारत-पाकिस्तान महामुकाबला स्कोअर अपडेट्स

 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी इथं क्लिक करा

indvspak23552519 मार्च : टी 20 वर्ल्डकपमध्ये अत्यंत चुरशीच्या अशा सामन्यात भारताने पाकिस्तानला 118 धावांत गुंडाळलंय. फिरकी बॉलरच्या मार्‍यापुढे पाकची टीम अडखळली पण धावाधाव सुरूच होती. 18 ओव्हर खेळत पाकिस्तानने 118 धावा पूर्ण केल्यात. पाकने भारताला 119 धावांचं आव्हान दिलंय.

पावसाच्या व्यत्ययामुळे भारत-पाकिस्तान हायहोल्टेज मुकाबला अखेर तासाभराच्या उशिराने सुरू झाला. सकाळपासून कोलकात्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे भारत पाक सामन्यावर अनिश्चितीचे ढग जमा केले होते. पण, संध्याकाळी वरुणराजानी कृपा दाखवत वाट मोकळी करून दिली.  कोलकात्याच्या ईडन गार्डनवर तासाभराने महामुकाबला सुरू झाला पण पावसाच्या हजेरीमुळे 18-18 ओव्हरने हा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. भारताने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं.

पाकने संयमाने सुरुवात करत सहाव्या ओव्हरमध्ये एकही विकेट जाऊ दिली नाही. पण, आठव्या ओव्हरमध्ये सुरेश रैनाने पाक टीमला सुरुंग लावला. रैनाने शरजील खानला आऊट केलं. त्यानंतर 10 व्या ओव्हरमध्ये जसप्रीतने अहमद शहजादला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. टीमची कमान सांभळण्यासाठी आलेल्या कॅप्टन शाहिद आफ्रिदी काही कमाल दाखवू शकला नाही. हार्दिक पांड्याने 11 ओव्हरमध्ये 8 रन्सवर आफिद्रीला आऊट करून पाकला मोठा धक्का दिला. त्यानंतर 16 व्या ओव्हरमध्ये रविंद्र ज़डेजाने उमर अकमलला 22 रन्सवर आऊट केलं. अखेरच्या चार ओव्हरमध्ये पाकिस्तानने टीम 44 रन्स कुटून धाव फलक उंचावला. निर्धारित 18 ओव्हरमध्ये पाकने 5 विकेटवर 118 धावा रचल्यात. आता भारतापुढे 119 धावांचं टार्गेट आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2016 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close