छगन भुजबळांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

Samruddha Bhambure | Updated On: Mar 17, 2016 07:10 PM IST

छगन भुजबळांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई – 17 मार्च : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयानं 31 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

छगन भुजबळ यांना सोमवारी (14 मार्च) ईडीनं चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याच रात्री त्यांना अटक केली होती. त्यावेळी ईडीनं त्यांची तब्बल 11 तास चौकशी केली होती. मात्र चौकशीत भुजबळ सहकार्य करत नसल्याचा ठपका ईडीनं ठेवला होता. त्याच आधारावर सत्र न्यायालयानं भुजबळांना दोन दिवसांची कोठडी सुनावली होती. ही मुदत आज संपल्यानंतर ईडीनं न्यायालयाला कोठडीचा कालावधी वाढवण्याची विनंती केली.

दरम्यान, आज सकाळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी समीर यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं. ईडीच्या अधिकार्‍यांनी तब्बल चार तास या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली. तर भुजबळ यांची काल प्रकृती बिघडल्यानं ईडीच्या कार्यालयात त्यांची जेजे रूग्णालयातील 2 डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. तसंच आज न्यायालयात नेण्यापूर्वी त्यांची सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्येही तपासनी करण्यात आली. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं जे.जे. हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

कोर्टात काय घडलं?

ईडी वकील

- 7 दिवस कोठडी हवी

- वैद्यकीय उपचारात वेळ वाया गेला

- भुजबळ बरे आहेत असं डॉक्टर म्हणाले

- अजून बराच तपास बाकी आहे.

भुजबळांचे वकील

- भुजबळांचं वय 69 वर्षं आहे

- त्यांना अस्थमाचा त्रास आहे

- ईडीची चौकशी पूर्ण झाली आहे

भुजबळ

- ईडी अधिकारी नुसतं बसवून ठेवतात

- त्यांच्या मर्जीप्रमाणे स्टेटमेंट घेतात

- मी कधीही मंत्रीपदाचा गैरवापर केला नाही

ईडी

- ईडीने 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली

- बुधवारचा दिवस फक्त वैद्यकीय उपचारात वाया गेला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2016 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close