भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा : शिवसेना

भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा : शिवसेना

  • Share this:

sena_on_owasiमुंबई - 17 मार्च : भारतमाता की जय असे कधीच बोलणार नाही अशी बांग ओवेसीने ठोकली. अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्र सामनामधून करण्यात आली. तसंच ओवेसी यांनी भारतमातेचा अपमान केला आहे. आता ओवेसीच्या विरोधात मुसलमानांनी भारतमातेचा जयजयकार करावा. जे भारतमातेचा जय म्हणणार नाहीत त्यांचे नागरिकत्व रद्द करा. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या अशी खरमरीत टीकाही 'सामना'तून केली आहे.

भारत माता की जय म्हणणार नाही आण हे कुठे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही असं व्यक्तव्य एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी केलं होती. त्यांच्या या वक्तव्याला आदेश माणून त्यांचे आमदार वारिस पठाण यांनीही विधानसभेत भारत माता की जय म्हणणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. या सर्व प्रकरणाचा आज शिवसेनेनं सामनातून समाचार घेतलाय.

तिरंग्याचा अनवधानाने अपमान झाला म्हणून गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आणि तो आजही तुरुंगात आहे. महाराष्ट्रात येऊन असादुद्दीन ओवेसीने भारतमातेचा अपमान करून देशद्रोहच केला नाही काय? आपल्या गळ्यावर कुणी चाकू लावला तरी भारतमाता की जय असे कधीच बोलणार नाही अशी बांग ओवेसीने ठोकली. खरे म्हणजे अशा लोकांच्या गळ्यास फक्त चाकू कसला लावता? त्यांची गर्दनच कायद्याने उडवायला हवी अशी विखारी टीका सामनातून करण्यात आलीये.

तसंच स्वातंत्र्य लढ्यात भारत माता की जय हा महत्वाचा नारा होता. हिंदूंबरोबर मुस्लिमही हाच नारा देत फासावर चढले अशी आठवणही करून देण्यात आली. ओवेसी हा जातीय गरळ ओकून मतपेटी घट्टा करण्याचा प्रयत्न करतोय. ओवेसी सरकारवर थूंकून सहिसलामत बाहेर पडतोच कसा, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे अशी मागणीही सेनेनं केली.

यांना भारत माता की जय म्हणायचं नाही, त्यांना समान नागरी कायदा नको, अशा लोकांनी भूईचा भार बनून राहु नये. उच्च शिक्षित ओवेसी तरी सुधारक म्हणून कार्य करतील असं वाटलं होतं मात्र तेही लफंगेच निघाले. महाराष्ट्राच्या विधानसभेतही ओवेसींची वारस आहेत. ज्यांना भारत माता की जय म्हणायचे नाही त्यांचे नागरिकत्व रद्द केले पाहिजे अशी थेट मागणीच सेनेनं केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2016 09:50 AM IST

ताज्या बातम्या