News18 Lokmat

रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याने स्कायवॉकवरुन मारली उडी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2016 09:15 AM IST

रॅगिंगला कंटाळून विद्यार्थ्याने स्कायवॉकवरुन मारली उडी

stop_raggingकल्याण - 17 मार्च : उल्हासनगर येथील कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने रॅगिंगला कंटाळून स्कायवाक वरून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीये. चाळीस फूट उंचावरून उडी मारून देखील विद्यार्थ्याचा हात मोडला असून त्याच्यावर आता सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भूषण मुंडोकार हा विद्यार्थी याच वर्षी विदर्भातून शिकण्यासाठी उल्हासनगर येथे आला. स्वभावाने थोडा लाजरा-बुजरा आणि खेडेगावातून आल्याने पटकन कुणाशी बोलण्यास न धजावणार तरुण आहे. त्याने याच वर्षी येथील एसएसटी महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला. उल्हासनगर येथील हनुमाननगर येथे रहाणारा हा विद्यार्थी घरातून निघाला की काही कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या मागे लागत आणि त्याला कॉलेजपर्यंत चिडवून भंडावून सोडत असे त्यानं सांगितलं. मात्र, आपण नवीन असल्याने जे विद्यार्थी आपल्याला चिडवतात त्यांची नावे माहित नाहीत. मात्र, समोर आले तर आपण त्यांना ओळखू असं या भूषणने सांगितलं. विद्यार्थ्याने त्या विद्यार्थ्यांना ओळखले तर आपण त्यांच्यावर कडक कारवाई करू असं आश्वासन कॉलेजच्या प्राध्यापकांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 17, 2016 08:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...