सलामीच्या लढतीत भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडचा ४७ रन्सने विजय

सलामीच्या लढतीत भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडचा ४७ रन्सने विजय

  • Share this:

IMG_20160315_230605१५मार्च : "आमची गाडी आता सहाव्या गिअरमध्ये आहे"असं सांगणाऱ्या धोणीची सैना किवीसमोर सलामीच्याच सामन्यात ढेर झाली. अवघ्या ७९ धावांमध्ये टीम इंडिया खुर्दा पडला. न्यूझीलंड टीमने दणदणीत ४७ धावांनी विजय मिळवला असून शानदार विजयी सलामी दिलीये.

टी-20 वर्ल्ड कपला आज धडाक्यात सुरुवात झाली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान सलामी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.किवीने दिलेल्या १२७ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये धक्के पे धक्का बसला. सलामीला आलेले शिखर धवन आणि रोहित शर्मा झटपट आऊट झाले. त्यानंतर सुरैश रैना, रवींद्र जडेजा स्वस्तात आऊट झाले कोहलीने टीम इंडियाची कमान सांभळली पण २३ रन्सवर तोही आऊट झाला. धोणीने टीम इंडियाची कमान सांभाळत अखेरपर्यंत झुंज दिली पण निर्णायक क्षणी धोणी ३० रन्सवर आऊट झाला आणि टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला. १९ व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाचा ७९ धावांमध्ये गाशा गुंडाळला गेला.

.त्यापुर्वी न्यूझीलंडने टॉस जिंकत पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी उतरलेल्या मार्टिंन गुप्टिलने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर सिक्स लगावत धडाकेबाज सुरूवात केली. पण, दुसर्‍याच बॉलवर आर.आश्विनने गुप्टिलला आऊट केलं. त्यानंतर दुसर्‍याच ओव्हरमध्ये आशिष नेहराने कॉलिन मन्रोलाही तंबूत पाठवलं.

यानंतर न्यूझीलंडने मुकाबला करायचा प्रयत्न केला पण सुरेश रैनाने न्यूझीलंड कॅप्टन केन विल्यमसनला स्टंपिंगने आऊट केलं.रैनाने फिल्डिंग करताना कमाल करत डायरेक्ट हिटने रॉस टेलरला आऊट केलं. पिचचा अंदाज घेत धोणीने स्पीनिर्सची फौज उतरवली. स्पीनिर्सने किवीला उतरती कळा लावली. किवीने संयमी बॅटिंग करत सहा विकेटवर कसाबसा 100 चा टप्पा ओलांडला. अखेरच्या दोन ओव्हरमध्ये लुईक रोंचीने 21 रन्स कुटत 126 चा टप्पा गाठला. निर्धारित 20 ओव्हरमध्ये किवीने 7 विकेटवर 126 रन्स पूर्ण केले. भारतासमोर आता विजयासाठी 127 धावांचं आव्हान दिले पण धोणी ब्रिगेडला हे आव्हान पेलवता आलं नाही अवघी टीम ७९ धावांत गुंडाळली गेली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 15, 2016, 11:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading