सातव्या वेतन आयोगाचा पैसा शेतकर्‍यांनाही द्या - नाना पाटेकर

सातव्या वेतन आयोगाचा पैसा शेतकर्‍यांनाही द्या - नाना पाटेकर

  • Share this:

nana-patekar-759

तुळजापूर  - 14 मार्च : सातव्या वेतन आयोगाची रक्कम प्रचंड मोठी आहे. शिवाय अनेक कर्मचार्‍यांना न मागता पैसा मिळतो, त्याच धर्तीवर गरजू शेतकर्‍यांनाही पैसा मिळायला हवा. सर्व सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार्‍या सातव्या वेतन आयोगाचा पैसा अधिक आहे, त्यामुळे हा पैसा शेतकर्‍यांना देण्याची मागणी अभिनेता नाना पाटेकर यांनी केली आहे.

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यातील अणदूर इथे शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात आली. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 1 टक्का अधिभार लावण्याच्या मागणीचेही नाना पाटेकर यांनी समर्थन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 15, 2016, 7:19 AM IST

ताज्या बातम्या