सूरज परमार आत्महत्याप्रकरणी चारही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे आदेश

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 14, 2016 09:48 AM IST

suraj_parmarठाणे - 14 मार्च : सूरज परमार आत्महत्याप्रकरणी आरोप असेलेल्या ठाण्यातल्या 4 नगरसेवकांचं पद धोक्यात आलंय. या नगरसेवकांवर गंभीर आरोप असल्यानं येत्या महिनाभरात कारवाई करून त्यांचं पद रद्द करावं असं पत्र नगरविकास विभागानं ठाणे महापालिकेला पाठवलंय.

महापालिकेनं कारवाई केली नाही तर राज्य सरकार कारवाई करेल असंही या पत्रात म्हटलं आहे. परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांचा उल्लेख केला होता. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना तुरूंगातही पाठवण्यात आलं होतं. आता त्या सर्वांना जामीन मिळाला आहे. ठाणे महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यानं नगरविकास विभागानं सुरू केलेल्या या कारवाईमुळं ठाण्यात नवा राजकीय संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2016 09:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...