तुर्कस्तानच्या राजधानीत बॉम्बस्फोट, 34 ठार

तुर्कस्तानच्या राजधानीत बॉम्बस्फोट, 34 ठार

  • Share this:

turky3तुर्कस्तान - 14 मार्च : तुर्कस्तानची राजधानी अंकारा रविवारी संध्याकाळी बॉम्बस्फोटाने हादरली. या बॉम्बस्फोटामध्ये 34 जण ठार झाले, तर 125 पेक्षा जास्त जखमी झाले. हा आत्मघातकी बॉम्बहल्ला असावा असा अंदाज एका सुरक्षा अधिकार्‍यानं व्यक्त केला.

अंकारामधल्या मुख्य चौकाजवळ एका बस स्टॉपजवळ हा बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त स्थानिक मीडियानं दिलंय. या स्फोटानंतर अनेक वाहनांनी पेट घेतला. घटनेनंतर अनेक अँम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी नंतर तो भाग वाहतुकीसाठी बंद करून टाकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 14, 2016 08:16 AM IST

ताज्या बातम्या