पाकिस्तानची क्रिकेट टीम अखेर भारतात दाखल

पाकिस्तानची क्रिकेट टीम अखेर भारतात दाखल

  • Share this:

pak_teamकोलकाता - 12 मार्च : पाकिस्तानची क्रिकेट टीम अखेर भारतात दाखल झाली आहे. आयसीसी विश्वचषक टी-20 स्पर्धेसाठी पाकिस्तान टीम कोलकातामध्ये दाखल झाली.

यापूर्वी पाकिस्तान टीमला भारतात पाठवण्याबाबत बरंच राजकारण झालं. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पण शुक्रवारी संध्याकाळी पाक टीम भारतात येण्याचं निश्चित झालं. मुळ टुर्नामेंटच्या आधी पाकिस्तान टीमनं 2 वॉर्म-अप मॅचेस खेळायचं ठरलं होतं.. पण आता एकच वॉर्म-अप मॅच सोमवारी श्रीलंकेविरुद्ध खेळली जाणार आहे. यापूर्वी पश्चिम बंगालविरोधात ही एक स्पर्धा होणार होती, पण पाक टीमच्या भारतात येण्याच्या विलंबामुळे ती रद्द झाली.16 मार्चला पाकची टुर्नामेंट सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 12, 2016, 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading