इतके दिवस सरकार काय झोपलं होतं काय ? -अजित पवार

  • Share this:

ajit_pawar_vs_cmfadanvisअहमदनगर - 12 मार्च : दुष्काळामुळे लोकं स्थलांतर करतायत. लातूरसह अनेक ठिकाणी एक महिना पाणी मिळत नाही. दुष्काळाची पुर्वतयारी सरकारनं का केली नाही. इतके दिवस सरकार काय झोपलं होतं काय ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय.

पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर सड़कुन टीका केली. दूध दर, चारा, दुष्काळाच्या

कात्रीत शेतकरी सापडलाय पण त्याला बाहेर काढण्याची धमक सरकारमध्ये नसल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय.

तसंच विजय मल्ल्या देश सोडून लंडनला जातो. मात्र, शेतकर्‍यांच्या मालमत्तांवर त्वरीत जप्तीची कारवाई होते असा टोलाही त्यांनी भाजप सरकारला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 12, 2016, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading