News18 Lokmat

अनधिकृत बांधकामं अधिकृत ही सरकारची बिल्डरांसोबत 'डील'-राज ठाकरे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2016 06:00 PM IST

raj thackaey pcनाशिक - 12 मार्च : अनधिकृत बांधकाम प्रकरणी बिल्डरांवर कारवाई करण्याचं सोडून त्यांच्यावर मेहरबानी दाखवत सगळी काम अधिकृत का करण्यात आली ?, असा प्रश्न उपस्थिती करत सरकार आणि बिल्डरांची डील झालीये असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय.

राज्य सरकारने 31 डिसेंबर 2015 पर्यंतली बेकायदा काम अधिकृत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केली. या निर्णयामुळे नवी मुंबईतील दिघा, ठाणे, पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामात राहणार्‍या रहिवाशांना दिलासा मिळालाय. राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलीये. अनधिकृत इमले उभारून अनेकांच्या जीवाशी खेळ करणार्‍या बिल्डरांवर कारवाई का केली नाही ?, ठाण्यात अनधिकृत बांधकामात अनेकांचे जीव गेले हे सरकारच्या लक्षात नाही का ?, आज अनधिकृत बांधकामांना अधिकृत करून या बिल्डरलॉबीला पुन्हा अनधिकृत बांधकाम करण्यास मोकळे रान उपलब्ध करून दिले आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली. बिल्डर लॉबीने राज्य सरकारची भेट घेतल्यानंतर हा निर्णय झाला असा आरोपही राज यांनी केला.

तसंच आपण रिक्षा परवान्यांबाबतचं आंदोलन मागे घेतलं नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. नवीन परवान्यांच्या रिक्षाच रस्त्यावर आल्या नाहीत. त्यामुळे कोणी गैर फायदा घेवू नये यासाठी आंदोलन थांबवा अशी सुचना केली होती. पण, माझ्या पत्राचा चुकीचा अर्थ घेतला असंही राज म्हणाले. ज्यावेळी या नव्या परवान्याच्या रिक्षा रस्त्यावर दिसतील तेव्हा आंदोलन केलं जाईल असंही राज यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 12, 2016 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...