हार्बर मार्गाच्या प्रवाशांनो इकडे लक्ष द्या !, आज शेवटची लोकल रात्री 10.18 ला

हार्बर मार्गाच्या प्रवाशांनो इकडे लक्ष द्या !, आज शेवटची लोकल रात्री 10.18 ला

  • Share this:

mumbai_localमुंबई - 12 मार्च : हार्बर मार्गाच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी....आज (शनिवारी) सीएसटीवरुन पनवेलला जाणारी शेवटची लोकल रात्री 10.18 मिनिटांने सुटणार आहे. कारण हार्बर मार्गावर आज रात्रीपासून उद्या पहाटे 6 पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील डीसी ते एसी विद्युत परिवर्तन चाचणीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर उद्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. सीएसटी-पनवेल शेवटची लोकल आज रात्री 10.18 वाजता तर शेवटची सीएसटी-वाशी लोकल रा. 10.37 वाजता सुटेल, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिलीये. तर सीएसटी ते पनवेल, अंधेरी आणि ठाणे-वाशी-नेरूळ-पनवेल दरम्यानची वाहतूक विशेष मेगाब्लॉकच्या काळात बंद असणार आहे. त्यामुळे उद्या हार्बरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2016 01:53 PM IST

ताज्या बातम्या