रिक्षा आंदोलन थांबवा, राज ठाकरेंचा आदेश

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2016 07:40 PM IST

Raj thackray bannerमुंबई- 11 मार्च : 'परवाने मिळालेल्या नव्या रिक्षा जाळून टाका' असा थेट आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला खरा पण यावर चौहीबाजून टीका झाल्यामुळे राज यांनी आपला आदेश मागे घेतं आंदोलन थांबवा, पुढच्या आदेशाची वाट पाहा असा नवा आदेश कार्यकर्त्यांना जारी केला आहे.

मनसेच्या 10 व्या वर्धापनदिनी ष्णमुखानंद सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जोरदार भाषण ठोकलं. 70 हजार रिक्षा वाटप केलं जाणार आहे. यात 70 टक्के परवाने हे परप्रांतियांना दिले जाणार आहे असा आरोप करत या नवे परवाने मिळालेल्या रिक्षा रस्त्यावर उतरल्या तर जाळून टाका असा आदेशच राज ठाकरेंनी दिला होता.

तसंच 70 हजार रिक्षांचा स्टॉक राहुल बजाज यांच्या बजाज ऑटोमध्ये कसा उपलब्ध आहे. राज्य सरकारने याबद्दल उत्तर द्यावं अशी मागणीही केली होती.  राज यांच्या आदेशनानंतर मुंबई अंधेरी आरटीओवर मनसेसैनिकांनी मोर्चा काढला.

तर दुसरीकडे राज यांच्या चिथावणीखोर आदेशामुळे सर्वच पक्षांनी राज यांच्यावर टीका केली. राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी भाषण तपासून पाहणार जर आक्षेपार्ह काही आढळलं तर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

एवढंच नाहीतर गुरुवारी रात्री अंधेरी अज्ञात हल्लेखोरांनी रिक्षाही पेटवून दिलीय. राज यांच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडेच संशयाने पाहिलं जातंय. त्यामुळे, राज ठाकरे यांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय. सध्याच आंदोलन करू नका अशा सुचना राज यांनी दिल्यात. पुढचा आदेश मिळाल्यावरच आंदोलन करा असा आदेशही राज ठाकरेंनी दिला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2016 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...