IBN लोकमत इम्पॅक्ट : मोहितला मिळणार हक्काचं घर

  • Share this:

deshyatra310 मार्च : शौर्यपुरस्कार मिळवणार्‍या मोहित दळवीच्या घरावर पालिका हातोडा चालवणार होती. आता मात्र, या बालवीराला हक्काचं घर मिळणार आहे. कारण, मोहित दळवीला मुंबई महापालिका नवं घर देणार आहे,अशी घोषणा आज करण्यात आलीये. या प्रकरणाचा पाठपुरावा नुकताच आयबीएन लोकमतच्या 'देशयात्रा' या कार्यक्रमात करण्यात आला होता.

25 एप्रिल 2014 रोजी दिवा इथं राहणार्‍या कृष्णा पाष्टे ही नऊ वर्षांची मुलगी बाणगंगेच्या तलावात बुडत असतांना मोहित दळवीने पाहिले आणि प्रसंगावधान राखत तलावात उडी घेऊन कृष्णाला सुखरूप वाचवले. या शौर्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोहितला बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. या पुरस्काराचा आनंद साजरा करतांना मोहित आणि त्यांच्या कुटुंबियांना पालिकेनं धक्का दिला. मलबार हिल इथं मोहितचं राहतं घरं अनधिकृत असल्याची नोटीस मुंबई पालिकेनं बजावली होती. त्यामुळे मोहितवर बेघर होण्याची वेळ आली. मागील आठवड्यातच आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी 'देशयात्रा' या आमच्या कार्यक्रमात मोहित दळवीची व्यथा जाणून घेतली होती. आपण बेघर होतं असल्याचं दु:ख मोहितने यावेळी बोलूनही दाखवलं होतं. मीडियाच्या रेट्यापुढे अखेरीस महापालिकेला या बालवीराबद्दल जाग आली असून मोहित दळवीला घर देण्याची घोषणा पालिकेनं केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 10, 2016, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading