S M L

औरंगाबाद : अरेरे, 'रेणू'च्या तिसर्‍या बछड्याचाही मृत्यू

Sachin Salve | Updated On: Mar 9, 2016 08:45 PM IST

Renu231औरंगाबाद - 09 मार्च : शहरातील सिद्धार्थ उद्यानात रेणू या बिबट्या मादीच्या तिसर्‍या बछड्याचाही मृत्यू झाला. रेणूने काल मंगळवारी तीन पिलांना जन्म दिला होता. मात्र आज सकाळी तीनपैकी दोन पिलांचा मृत्यू झालाय.एका पिलाला वाचवण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. पण त्यात त्यांना दुदैर्वानं अपयश आलं.

रेणू या मादी बिबट्याला डॉ.प्रकाश आमटे यांच्या आश्रमातून दोन आठवड्यांपूर्वीच सिद्धार्थ उद्यानात आणलं होतं. रेणूसोबत आमटे यांच्या आश्रमातून राजा नावाचा नर बिबट्याही आणण्यात आला होता. रेणू सिद्धार्थ उद्यानात आणण्याआधीच गरोदर होती. पिल्लांना जन्म देण्याआधीच तीन दिवसांपासून रेणू आजारी होती..तिला गॅस्ट्रोची लागण झाली होती. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून तिनं काही खाल्लं नव्हतं. त्यामुळे तिला पिल्लांना पाजता आलं नाही. पिलांना बाहेरून दूध पाजण्यात आलं. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाले, पण त्यात यश आलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2016 08:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close