ठरलं !, भारत-पाक टी -20 महामुकाबला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रंगणार

  • Share this:

indvspak33209 मार्च : टी-वर्ल्ड कपमध्ये होणार्‍या भारत-पाकिस्तान मॅचच ठिकाणाबाबत अखेर संभ्रम मिटलाय. धरमशाला ऐवजी कोलकात्यातील ईडन गार्डनवर हा सामना खेळवण्याचं ठरवण्यात आलंय.

धरमशालामधल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नाराजी व्यक्त केली होती. यासाठी पाकिस्तानच्या 2 सदस्यीय पथकानं धरमशालामध्ये येऊन सुरक्षेसंबंधीची पाहणी केली होती. आणि त्यानंतर त्यांनी सुरक्षाव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करत, मॅचसाठी दुसरं ठिकाण निवडण्याची मागणी केली होती. कोलकाता किंवा मोहालीला मॅच हलवण्याची विनंती बीसीसीआय आणि आयसीसीला केली होती. अखेरीस कोलकातावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत हा सामना आता ईडन गार्डनवर रंगणार हे आता स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2016 05:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading