घरगुती वादातून आईने घोटला मुलीचा गळा

घरगुती वादातून आईने घोटला मुलीचा गळा

  • Share this:

solapur_new2323सोलापूर - 08 मार्च : एकीकडे महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत असतांना शहरात आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीये. एका आईने आपल्या पोटच्या मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. रेश्मा सुरवसे असं या महिलेचं नाव आहे. तिची एक वर्षाची मुलगी जिने यात आपला जीव गमावला. तर 3 वर्षांची ऋतुजा सुखरूप आहे. घरात झालेल्या वादातून रेश्माने हे कृत्य केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी आई रेश्मा हिला ताब्यात घेतलंय.

सोलापुरातल्या मड्डी वस्तीत मोलमजुरी करणार्‍या राम सुरवसे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. पण कामाच्या ठिकाणी लागणारी टेप ते विसरले म्हणून ते घरी आले तर बायको म्हणजे रेश्मा दार उघडेना. त्यांना संशय आला म्हणून त्यांनी जोर लावून दरवाजा उघडला तर रेश्मा आपल्या 3 वर्षांच्या मुलीला फास लावत होती आणि तिने आपल्या एक वर्षांच्या मुलीचा आधीच जीव घेतला होता. हे सगळं पाहुन राम यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानी दुसर्‍या मुलीची तिच्या तावडीतून सुटका केली. आपल्या पत्नी रेश्माविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून आई रेश्माला ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणाचा पोलीस अधीक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 8, 2016, 8:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading