जीवघेणा चेंडू! स्वत:ला वाचवण्यासाठी मैदानातच बसला आंद्रे रसेल, पाहा VIDEO

जीवघेणा चेंडू! स्वत:ला वाचवण्यासाठी मैदानातच बसला आंद्रे रसेल, पाहा VIDEO

हेल्मेट न घालनं रसेलला पडलं महागात, पाहा कसा वाचवला जीव.

  • Share this:

अबू धाबी, 22 नोव्हेंबर : आक्रमकता, विक्रम यांच्या पलीकडे क्रिकेटच्या मैदानात कधीकधी थरारक प्रसंगही घडतात. नेहमी मैदानावर गोलंदाजांच्या चेंडूचा सामना करणाऱ्या फलंदाजांसाठी काहीवेळा कठिण प्रसंगांचा सामना करावा लागतो. असाच एक जीवघेणा प्रसंग अबुधाबीमध्ये सुरू असलेल्या टी-10 स्पर्धेत घडला.

टी-20 स्पर्धेनंतर क्रिकेटमधला रोमाचंक वाढवण्यासाठी टी-10 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मात्र या स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात दररोज अजब प्रसंग घडत आहेत. असाच एक प्रकार आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलसोबत घडला. टी-10मध्ये बंगाल टायगर्स आणि नॉर्दन वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका 17 वर्षांच्या गोलंदाजानं रसेलची झोप उडवली. बंगाल टायगर्स संघाकडून खेळताना अफगाणिस्तानचा गोलंदाज कायस अहमदचा चेंडू रसेलसाठी जीवघेणा ठरला.

कायस अहमदचा जबरदस्त चेंडू

या सामन्याच्या डावात सहाव्या ओव्हरमध्ये कायस अहमदनं (Qais Ahmed) आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांना हैरान केले. यात मोठे सिक्स मारणार आक्रमक आंद्रे रसेलही स्वत:ला वाचवू शकत नाही. कायसच्या जीवघेण्यात बाउंसरमुळे रसेल थोडक्यात वाचला. फिरकी गोलंदाज असल्यामुळं विना हेल्मेट मैदानावर उतरलेल्या रसेलच्या डोक्यावर चेंडू आदळणार तेवढ्यात तो खाली बसला. त्यामुळं त्याच्या डोक्याला चेंडू लागला नाही. त्यानंतर रसेलनं लगेचच हेल्मेट मागून घेतला. या जीवघेण्या चेंडूनंतर कायसनं रसेलची माफी मागितली.

वाचा-टीम इंडिया पदार्पणासाठी सज्ज, गुलाबी रंगात रंगलं इडन गार्डन; पाहा VIDEO

वाचा-असं कोण आऊट होतं का? बघा क्रिकेटपटूला अतिआत्मविश्वास कसा नडला, VIDEO VIRAL

रसेलची आक्रमक खेळी

आंद्रे रसेलला कायसनं त्रास दिला असला तरी या सामन्यात त्यानं 25 चेंडूत 41 धावा केल्या. मात्र त्याच्या आक्रमक खेळीनंतरही रसेलचा संघ 6 धावांनी पराभूत झाला. बांगला टायगर्सनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर 102 धावांचे आव्हान पार करू दिले नाही. रसेलला त्रास देणारा कायस केवळ 19 वर्षांचा असून या स्पर्धेत त्यानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 5 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. कायसनं 8.77च्या सरासरीनं गोलंदाजी केली आहे.

वाचा-हा तर 'सुपरमॅन', एका क्षणात उडाला हवेत आणि..., पाहा अफलातून कॅचचा VIDEO

First published: November 22, 2019, 1:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading