गुगलकडून 'डुडल'द्वारे 'ती'चा गौरव

गुगलकडून 'डुडल'द्वारे 'ती'चा गौरव

  • Share this:

google-doodle-womens-day 08 मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने स्पेशल डुडल पोस्ट करून देशभरातील सर्व महिलांना महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्यात. भविष्यातील कर्तबगार महिलांबरोबर गुगलने महिलादिन साजरा करायचं ठरवलं आणि गुगलने 13 देशांमध्ये भेटी दिल्या तसंच तिकडच्या 337 महिला आणि मुलींना, 'वन डे आय विल..'(मी एके दिवशी करणार...) हे वाक्य पुर्ण करण्यास सांगितलं.

वाक्य पुर्ण करताना मिळालेल्या मजेशीर उत्तरांचा गुगलने छोटासा व्हिडिओ डुडलद्वारे बनवलाय.अगदी समलैंगिक विवाह करण्याची इच्छा ते देशासाठी ऑल्मिंपिक मेडल मिळवण्याच्या इच्छेपर्यंत महिला आणि तरूण मुली बोलताना दिसल्या. या स्पेशल डुडलमध्ये सॅन फ्रॅन्सिस्को, मेक्सिको, लागोस, मॉस्को, बर्लीन, लंडन, पॅरिस, बँकॉक, नवी दिल्ली, टोक्यो या शहरातील वयस्क महिलांच्या आगळ्यावेगळ्या महत्वकांक्षा व्हिडिओद्वारे शुट केल्या. व्हिडिओच्या शेवटला युनाइटेड नेशन्सच्या शांतिदुत जेन गुडबॉल म्हणतात, त्या एके दिवशी पर्यावरणाबद्दल पॉप फ्रान्सिसशी बोलतील तर मलाला युसुफजाई आणि सामाजिक कार्यकर्त्या मुझुन अलमेल्लाह यांनी, एके दिवशी सर्व मुलींना शाळेत जातील अशी महत्वाकांक्षा वर्तवली.

गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलय कि, महिलांशिवाय ह्या जगात काम करणं अशक्य आहे तर, वातावरण प्रसन्नही महिलांमुळेच राहते.गुगलसारख्या सर्च इंजिनने महिलांच्या महत्वाकांक्षेसाठी आणि त्यांच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी हि #ONEDAYIWILL डुडल्स तयार केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 8, 2016, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading