वर्ल्डकपदरम्यान स्टेडियमवर रिलायन्सची फ्री वायफाय सेवा

  • Share this:

reliance-jio-mobile-phoneमुंबई - 07 मार्च : भारतामध्ये होणार्‍या टी-20 वर्ल्ड कपच्या दरम्यान 'रिलायन्स जीओ' तब्बल सहा स्टेडियममध्ये मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देणार आहे .आज(सोमवारी) रिलायन्सने ही घोषणा क्रिकेटप्रेमींसाठी केली.

रिलायन्सच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स जिओ नेटने ह्या योजनेची सुरूवात ग्राहकांच्या कनेक्टीव्हिटीच्या तक्रारीपासून सुटका मिळवण्यासाठी केलीये. ग्राहकांच्या बर्‍याच दिवसांपासून रिलायन्सच्या नेट कनेक्टीव्हिटीबद्दल तक्रारी होत्या. म्हणून ही नवीन सेवा वर्ल्डकपदरम्यान देण्याचं रिलायन्सने ठरवलंय.

ज्या स्टेडियम्समध्ये ही वायफाय सेवा देण्यात येणार आहे. त्यामध्ये बंगळुरूमधील एम.चिन्नास्वामी स्टेडियम,धर्मशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ(एचपीसीए),कोलकत्तामधील ईडन गार्डन्स स्टेडियम,मोहालीतील पंजाब क्रिकेट संघ आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियम या सहा स्टेडियम्सचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2016 09:54 PM IST

ताज्या बातम्या