नारायण राणे पक्षातच पडले एकटे !

नारायण राणे पक्षातच पडले एकटे !

  • Share this:

rane_and_congressप्रफुल्ल साळुंखे - सिंधुदुर्ग - 07 मार्च : कणकवलीच्या वाळू आंदोलनात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना अटक होऊन 2 दिवस उलटलेत. पण काँग्रेस पक्षातून या पक्षीय आमदार अटकेचा निषेध तर सोडाच पण साधी प्रवक्ता पातळीवरची प्रतिक्रिया देखील देण्यासाठी कुणी पुढे आलेलं नाही. यामुळे फक्त तळकोकणातच नाहीतर काँग्रेस पक्षातही नारायण राणे पुन्हा एकदा एकाकी पडल्याचं चित्रं बघायला मिळतंय. दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आज सिंधुदुर्गात राणेंची भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निलेश राणे यांच्या सुरू असलेल्या आंदोलनात सर्व पक्षीय नेते एक झाले आहे. काँग्रेस पक्षात मात्र नारायण राणे एकाकी पडले. राणेंसाठी भूमिका घेण हे काँग्रेससाठी कायम "धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय " अशीच राहिलीय.

राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांच्या आंदोलनाच नेतृत्व केलं. या आंदोलनात नितेश राणेंना अटक झालीय. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेस आमदारला अटक झाली आहे. पण पक्षाकडून ना भूमिका ना प्रतिक्रिया उमटली.

राणे यांना काँग्रेस समजली नाही की त्यांनी समजून घेतली नाही हे कोड कायम आहे. राणेंना काँग्रेस मनापासून किती आवडली हा प्रश्नच आहे. म्हणूनच काय...विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण,अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण आणि आता अशोक चव्हाण आणि विखे पाटील

यां नेत्यांच्या परस्पर विरोधी भूमिकामुळे राणेंच्या भांडणात कुणी पडलंच नाही. त्यांना जाहीर पाठिंबा ही दिला नाही.

कोकणात राणे यांनी स्वयंभू पक्ष उभा केलात. तिथे पक्ष बांधणीसाठी कुणाला स्वारस्य नाही. राणे आहेत तोपर्यंत पक्ष अस्तित्वात राहणार म्हणून पक्षाला चिंता नाही.

इतर पक्षात मानाच स्थान मिळत नाही तोपर्यंत राणेंना काँग्रेस हवी आहे. आणि राणे अडचणीत असणे काँग्रेस नेत्यांना आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 7, 2016, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading