...ही भाजप-शिवसेनेची बेबंदशाही, नारायण राणे संतापले

  • Share this:

सिंधुदुर्ग - 06 मार्च : न्याय मागण्यासाठी आलेल्या डंपरचालकांवर बेकायदेशीर लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा जाहीर निषेध करतो. ही शिवसेना आणि भाजपची बेबंदशाही आहे असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला. तसंच जिल्हाधिकारी आणि एसपीविरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.naryan rane on sena4

सिंधुदुर्गात वाळु वाहतुकदारांचं आंदोलन आता वेगळं वळण घेतांना दिसतंय. जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड प्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांना कोर्टात हजर केलं तेव्हा त्यांना आणि त्यांच्या 38 कार्यकर्त्यांना 10 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठीडी देण्यात आली. यावर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी आणि एसपीविरोधात कोर्टात जाणार आहोत, राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असं राणे म्हणाले. जिल्ह्यात अवैध दारू गुत्ते आणि इतर धंदे बोकाळलेत,सरकार दडपशाही करतंय असा आरोपही राणेंनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय असंही राणेंनी सांगितलं. तसंच पोलीस गाडीवाल्यांकडून हफ्ते घेतात त्यांच्या छळ आणि शोषणाविरोधात आंदोलन करणार असल्याचंही नारायण राणे म्हणाले. या आंदोलनाबद्दल उद्या भूमिका स्पष्ट करणार असल्यांचं राणेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 6, 2016, 8:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading