क्रुरकर्मा हसनैन बहिणीवरच करायचा लैंगिक अत्याचार

  • Share this:

thane_muder_Caseठाणे- 06 मार्च : ठाण्यातील वरेकर हत्याकांडाचं गूढ अखेर उकललंय. आपला भाऊ हा मानसिक रुग्ण असलेल्या बैतुल या सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करत होता आणि त्याची वाच्यता सगळीकडे होईल या भीतीनेच त्याने अख्खं कुटुंबच संपवून टाकलं असं हसनैनची वाचलेली बहीण सुबिया हिने जबाब दिलाय. पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला.

क्रुरकर्मा हसनैन वरेकर हा आपल्या सगळ्याच बहिणी बरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करीत असे आणि आपल्या गतिमंद बहिणीवर लैंगिक अत्याचार करीत असे याची माहिती असल्यानेच त्याच्या आईने त्याचे लग्न लाऊन टाकले होते अशी धक्कादायक माहिती त्याची बहीण सुबिया हीने दिली आहे. या हत्याकांडातून फक्त सुबियाच सुदैवाने वाचली असून तिच्यावर देखील उपचार करण्यात आले.

"त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हसनैनने आपल्या सगळ्याच बहिणी बरोबर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. सगळ्याच बहिणीना त्यांच्या वयाचा विचार न करता तो मस्करी करीत शरीराला नको तिथे स्पर्श करीत असे. हे पाहून त्यांच्या आई ला पुढच्या परिणामांची जाणीव झाली आणि तिने त्याचे लग्न लाऊन टाकण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या कृत्याचा सुबियासह सगळ्याच बहिणीना राग येत असे.

परंतु त्याच्या या विकृतीचा कळस तेव्हा झाला जेव्हा त्याने आपल्या बैतुल नावाच्या गतिमंद बहिणीवर सातत्याने अत्याचार करू लागला. त्यांची आई जेव्हा कधी कामासाठी बाहेर जात असे तेव्हा हसनैन आपल्या या बहिणीवर लैंगिक अत्याचार करीत असे.

आईने हसनैन यास विनवणी करुन " मैनै तेरोके जनम दिया है, मेरे को मत मार, मत मार असा रडत बोलण्याचा आवाज येत होता. मात्र मै सबको मारके फासी पे लटकने वाला अस तो म्हणाला अशी माहिती सुबिया ने आपल्या जबाबात पोलिसांना दिली आहे.

हसनैनची बहीण सुबियाचा जबाब

- हसनैन हा आपल्या सगळ्याच बहिणींशी अश्लिल चाळे करायचा

- बैतुव या गतिमंद बहिणीवर लैंगिक अत्याचार करायचा

- घरी कोणी नसताना तो वारंवार गतिमंद बहिणीवर लैंगिक अत्याचार करत होता

- या प्रकाराची आईला कल्पना होती. त्यामुळे घरच्यांनी हसनैनचं लग्न लावून दिलं

- हत्या करताना आई हसनैनला रडत रडत विनवणी करत होती, मैने तुझे जनम दिया है, मुझे मत मार. मात्र हसनैनने आईचं काहीच ऐकलं नाही

- मै सबको मारके फासी पे लटकने वाला हूँ असं त्यानं आईला उत्तर दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 6, 2016, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading