गुंगीचं औषध मिसळून हसनैनने केली सर्वांची हत्या

गुंगीचं औषध मिसळून हसनैनने केली सर्वांची हत्या

  • Share this:

Husnaindajsh

ठाणे - 05 मार्च : स्वत:च्याच कुटुंबातील 14 जणांची निर्घृण हत्या करणारा हसनैनने सगळ्यांना खाण्यातून गुंगीचं औषध देऊन हे भीषण हत्याकांड केलं, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.

हसनैनने या माथेफिरू तरुणाने 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री आपले आई-वडील, पत्नी, दोन मुले, बहिणी आणि भाचे अशा 14 जणांची हत्या करून स्वत: गळफास घेतला होता. या हल्ल्यातून केवळ त्याची बहीण सुबिया भारमल बचावली आहे. परंतु, तिच्या जबाबातून हत्येचं नेमकं कारण काही कळत नव्हतं. त्यामुळे हे हत्याकांड गूढच राहणार, असं वाटू लागलं होतं. पण फॉरेन्सिकच्या रिपोर्टमधून आणखीन एका महत्त्वपूर्ण माहितीचा उलगडा झाला आहे. जेवणानंतर सगळ्यांनी जो फालुदा खाल्ला, त्यात हस्नेलनं गुंगीचं औषधं मिसळलं होतं. त्यामुळे तो वार करत असताना कुणालाच जाग आली नाही, असं तपासातून समोर आल्याचं समोर आलं आहे. मात्र, या सगळ्याचा फायनल रिपोर्ट येणं बाकी आहे.

या सोबतचं, हसनैननं आपल्या बहिणी, मावशी आणि मेव्हण्यांकडून घेतलेल्या पैशांची अफरातफर केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 68 लाखांची रोकड आणि आणखी काही लाखांच्या दागिन्यांचा हा सगळा गैरव्यवहार होता, असं समजलं होतं. तसंच, हसनेनच्या बेडरूममध्ये स्किझोफ्रेनिया या आजारावरील काही औषधंही सापडली होती. त्यामुळे हुसनेनला स्किझोफ्रेनिया होता का?, तो कोणत्या मानसोपचारतज्ज्ञाकडे त्यावर उपचार घेत होता का?, या सर्व बाबी पोलीस तपासत आहे.

त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून, आर्थिक अफरातफरीतून सुटका करून घेण्यासाठी हसनेनं या हत्याकांडाचा सुनियोजित कट रचल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2016 07:11 PM IST

ताज्या बातम्या