S M L

शाहरूखच्या तारखांसाठी निर्मात्यांची रस्सीखेच

Samruddha Bhambure | Updated On: Mar 3, 2016 06:39 PM IST

 शाहरूखच्या तारखांसाठी निर्मात्यांची रस्सीखेच

03 मार्च : बॉलीवुडमध्ये चित्रपटांच्या रिलीजच्या तारखांसाठी निर्मात्यांना भांडतांना तर आपण पाहिलच असेल. पण आता बॉलीवुडचे निर्माते चक्क प्रमोशन्सच्या तारखांसाठीही एकमेकांशी भांडत दिसत आहेत.

शाहरूखचा 'फॅन' सिनेमा पुढच्या महिन्यामध्ये(23 एप्रिल) रिलीज होतोय, तर 'रईस'सिनेमा ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 3 जुलैला रिलीज होणार आहे. त्यामुळे 'फॅन' आणि 'रईस'चे निर्माते मात्र आपापसात भांडत असल्याच दिसुन येतंय.

प्रमोशनसाठी शाहरूखच्या बहुतांश तारखा या 'रईस'च्या निर्मात्यांनी आधीपासूनच बूक करून ठेवल्यात. त्यामुळे 'फॅन'च्या प्रमोशन्ससाठी मात्र शाहरूखच्या तारखा मिळवणं हे यशराज फिल्म्ससाठी मोठं आव्हानंचं ठरणार आहे.

चित्रपटांचे निर्माते प्रमोशनच्या तारखांसाठी कितीही मारामार करत असले तरी यासगळ्यात शाहरूखची चांगलीच धावाधाव होणार हे निश्चितंच.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 06:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close