कल्याण ते सीएसटी नॉनस्टॉप जलद लोकल, मध्य रेल्वेची चाचपणी सुरू

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2016 10:58 AM IST

 कल्याण ते सीएसटी नॉनस्टॉप जलद लोकल, मध्य रेल्वेची चाचपणी सुरू

mumbai_local3मुंबई - 03 मार्च : कल्याणहून निघणार्‍या गाडीत गर्दीच्या वेळी डोंबिवली इथं चढायला मिळणे मुश्कील होतं. मुंबईहून कल्याणला निघालेल्या गाडीत मुलुंडला उतरणं कठीण जातं. या आणि अशा अनेक तक्रारी टाळण्यासाठी मध्य रेल्वे अतिजलद गाडया चालवण्याच्या विचारात आहे. ऐन गर्दीच्या वेळी अर्ध्या तासाच्या अंतरात एकामागोमाग एक अशा आठ अतिजलद गाडया सोडण्याबाबत मध्य रेल्वे विचार करतेय. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्थानकांवरून सुटणार्‍या या गाडया थेट मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणार आहेत.

गेल्या काही वर्षांत मध्य रेल्वेवरील अनेक जलद गाडय़ांचे थांबे वाढवण्यात आले आहेत. मात्र, दरवाजात लटकणार्‍या टोळक्यांची दादागिरी, गाडीत जागा नसतानाही प्रत्येक स्थानकावर वाढणारा गर्दीचा रेटा आदी गोष्टींमुळे गाडीतून पडून होणार्‍या अपघातांमध्ये वाढ झालीय. यावर विविध उपाययोजनांचा विचार करणार्‍या मध्य रेल्वेने आता अतिजलद गाडयांबाबत विचार सुरू केलाय. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अर्ध्या तासाच्या अंतरात सात ते आठ अतिजलद गाडया लागोपाठ सोडता येतील का ?, याबाबत मध्य रेल्वे चाचणी करतेय. या गाडय़ा कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्थानकातून निघतील आणि थेट मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला येतील. त्यामुळे एकदा गाडीत चढल्यानंतर प्रवाशांना थेट सीएसटीला उतरता येईल. परिणामी गाडीत रेटारेटी होणार नाही असं ब्रिगेडिअर सूद यांनी सांगितलं. तसंच या गाडयांमुळे प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने त्या वेळेत आणखी दोन-तीन गाडय़ा वाढवून मधल्या स्थानकांवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या गाडयांना दादरला थांबा देणे आवश्यक असल्यास तसाही विचार मध्य रेल्वे करतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2016 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...