दारिद्र्य रेषेखालच्या दीड कोटी कुटुंबांना मिळणार गॅस कनेक्शन !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 29, 2016 05:46 PM IST

LPG gas sucidy29 फेब्रुवारी : केंद्र सरकारने गरीब घरातील महिलांच्या नावाने एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. या एलपीजी कनेक्शन उपलब्ध करण्यासाठी 2016 च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या म्हणण्यानुसार, 2016-17 दरम्यान दारिद्र्य रेषेखाली आलेल्या किमान 1.5 कोटी कुटुंबांना लाभ होणार आहे. ही योजना कमीतकमी दोन वर्ष चालेल,त्यामुळे ह्या अंतर्गत आणखी 5 कोटी दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांना ह्या योजनेत सामील करता येईल.

अर्थमंत्रींच्या म्हणण्यानूसार, या योजनेमुळे महिलांचं सशक्तीकरणाची आणि स्वास्थ्याची सुरक्षाही होईल. तसंच ग्रामीण विभागातील लोकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. अरूण जेटली यांनी 75 लाख मध्यमवर्गीय आणि दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबांचे आभार मानले. ज्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाची दखल घेतं सबसिडी घेण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 29, 2016 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...