अक्षयकुमार नौदल अधिकार्‍याच्या भूमिकेत

अक्षयकुमार नौदल अधिकार्‍याच्या भूमिकेत

  • Share this:

28 फेब्रुवारी : अक्षय कुमार आजकाल देशभक्तीवर आधारीत असलेल्या चित्रपटातून दिसुन येतोय आणि हिटही होतोय.अक्षय कुमार पुन्हा एकदा 'देशभक्त' म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 12 ऑगस्ट रोजी रिलीज होणार्‍या 'रूस्तम' या आगामी चित्रपटातून. या चित्रपटातून तो नौदल अधिकार्‍याची भूमिका साकारतोय.rustom

अक्षयने या चित्रपटातील आपला पहिला फोटो ट्विटरवर ट्विट केलाय. आणि या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत केल्याचंही दिसुन येतंय. त्यामुळे ह्या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चादेखील सुरू आहे.अक्षयने या आधी 'बेबी','एअरलिफ्ट' तसंच बर्‍याच चित्रपटातून देशभक्त म्हणून भूमिका केल्या होत्या. 'रूस्तम' या चित्रपटासाठी टिनू देसाईचं दिग्दर्शन आहे. टिनू देसाई या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.

तसंच 'बेबी' या चित्रपटाचा निर्माता नीरज पांड्ये हा 'रूस्तम'ची निर्मिती करणार आहे.अक्षयच्या सोबत चित्रपटामध्ये इलियाना डिक्रूझ आणि ईशा गुप्ता ह्या दोघीसुद्धा दिसणार आहे.चित्रपटाची स्टारकास्ट भलीमोठी नसली तरी अक्षयचे चित्रपट मात्र बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई करतात. अक्षय आता हा आपल्या रूस्तम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला काय आणेल हे 12 ऑगस्टलाच कळेल. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अक्षयचा हा रूस्तम चांगलीच कमाई करेल यावर शंकाच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 28, 2016, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading