हत्याकांडानं ठाणे हादरलं, 14 जणांची हत्या करून तरुणाची आत्महत्या

हत्याकांडानं ठाणे हादरलं, 14 जणांची हत्या करून तरुणाची आत्महत्या

  • Share this:

thane_muder_Caseठाणे - 28 फेब्रुवारी : घोडबंदर परिसरातल्या कासार वडवली इथं झालेल्या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरून गेलंय. हसनैन अन्वर वरेकर या 32 वर्षाच्या तरुणानं स्वत:च्याच कुटुंबातल्या 14 जणांची गळे चिरून हत्या केली. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली. मशिदीजवळ हा प्रकार घडलाय.

हसनैन हा उच्चशिक्षित तरुण होता. मात्र, काही दिवसापूर्वी हसनैनची नोकरी गेली होती. सध्या तो बेकार होता अशी माहिती आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. विशेष म्हणजे स्वत:च्याच जीवलगांचा जीव घेताना हसनैनला स्वतःच्या अडीच महिन्यांच्या मुलीचीही दया आली नाही. तिच्यासकट पत्नी, आई-वडिल, 3 बहिणी आणि त्यांची 5 मुलं यांची त्यानं अगदी अमानुषपणे गळा चिरून हत्या केली. त्यानंतर त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे ठाणे शहर आणि इतरत्रही खळबळ माजली आहे.

या भीषण हत्याकांडातून फक्त मारेकर्‍याची बहिण कशीबशी वाचू शकलीय. सुबिया सोजब भरमार असं तीचं नाव आहे. तिच्यावरही त्याने हल्ला केला होता. पण तीने वेळीच आरडाओरडा स्वतःचा जीव कसाबसा वाचवलाय. तिच्यावर सध्या ठाण्यातील टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिच्या जबाबातूनच हत्याकांडामागचं खरं कारण पोलिसांना कळू शकतं.

- भीषण हत्याकांड मृतांची नावं

- हसनैन अन्वर वरेकर, 32 वर्षे (मारेकरी)

- जबीन हसनैन वरेकर, 28 वर्षे (पत्नी)

- मुबतशिरा हसनैन वरेकर, 6 वर्षे (मुलगी)

- उमेरा हसनैन वरेकर, 3 महिने (मुलगी)

- अन्वर वरेकर, 65 वर्षे (वडील)

- असगडी अन्वर वरेकर, 55 वर्षे (आई)

- सबिना शौकत खान, 35 वर्षे (बहीण)

- सादिया शौकत खान, 16 वर्षे (भाची)

- अनस शौकत खान, 12 वर्षे (भाची)

- अली हसन शौकत खान, 5 वर्षे (भाचा)

- बतूल अन्वर वरेकर, 30 वर्षे (बहीण)

- मारिया अरफान फक्की, 28 वर्षे (बहीण)

- उमेर अरफान फक्की, 7 वर्षे (भाचा)

- युसुफ अरफान फक्की, 4 वर्षे (भाचा)

- आरसिया सोजेफ भरमल, 5 महिने (भाची)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2016 02:03 PM IST

ताज्या बातम्या