भारताने पाकिस्तानला लोळावलं, 5 विकेट्सने 'विराट' विजय

भारताने पाकिस्तानला लोळावलं, 5 विकेट्सने 'विराट' विजय

  • Share this:

27 फेब्रुवारी : भारताने आज पुन्हा एकदा पाकिस्तानावर हरवून दाखवलं. आशिया कपमध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने पाकवर 'विराट' विजयाची नोंद केलीये. विराट कोहलीच्या धडाकेबाज 49 धावांची खेळी आणि त्याला युवराजने दिलेली संयमी साथ यामुळे भारताने विजय रथ खेचून आणला. आशिया कपमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. आणि आतापर्यंत आशिया कपमध्ये पाकिस्तानवर हा सहाव्यांदा विजय आहे.virat yuvi

भारत आणि पाकिस्तानमध्ये अलीकडे ताणले गेलेले संबंध पाहता आज बर्‍याच दिवसांनंतर भारत आणि पाकिस्तान शेर-ए-बांगला स्टेडियमवर भिडले. भारताने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, भारतीय गोलदांजाच्या मार्‍यापुढे पाकच्या बॅटसमनचा टीकाव लागला नाही. हार्दिक पांड्या, आशिष नेहरा, जसप्रित ब्रुमरा, रविंद्र जडेजाने पाक टीमला सुरुंग लावला. आणि अवघी टीम 83 रन्स ऑलआऊट झाली. विजयाचं माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे शुन्यावर आऊट झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि सुरेश रैनाने टीमची कमान सांभळली. पण, तिसर्‍या ओव्हरमध्ये सुरेश रैना 1 रन्स आऊट झाला. पाकसारखीच आपली अवस्था होती की काय अशी पाल चुकचुकली. पण, युवराज सिंगने संयमी खेळी सुरू केली. आणि दुसर्‍याबाजूला विराटने धडाकेबाजी इनिंग पेश केली. विराटने 51 बॉल्समध्ये 49 रन्स केले. यात त्याने 7 चौकार लगावले. तर युवराजने संयमी 14 रन्सची खेळी केली. पण, 15 व्या ओव्हरमध्ये विराट 49 रन्सवर आऊट झाला. 1 रन्सपासून विराटचे अर्धशतक हुकले. तोपर्यंत भारत विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. हार्दिक पांड्या विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आला पण शुन्यावर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन कुल धोणीने युवराजला साथ देत विजयाची नोंद केली.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (रोहित शर्मा, 0.2 ov), 2-2 (अजिंक्य रहाणे, 0.4 ov), 3-8 (सुरेश रैना, 2.4 ov), 4-76 (विराट कोहली 14.1 ov), 5-76 (हार्दिक पांड्या, 14.3 ov)

पाकची इनिंग

त्याआधी मैदानावर उतरलेल्या पाक टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये आशिष नेहराने दणका दिला. 4 रन्सवर हाफिज सईद आऊट करत पाक टीमला सुरुंग लावला. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये शारजील खानला 7 रन्सवर जसप्रीत वुमराने कॅच घेत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर एकापाठोपाठ गडी बाद होण्याचा क्रम सुरू झाला. सातव्या ओव्हरमध्ये शोयब मलिक अवघ्या 4 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर टीमची कमान सांभाळण्यासाठी आलेल्या कॅप्टन शाहिद आफ्रिदी 1 रन्सवर रन आऊट झाला. त्यानंतर एकाही खेळाडू मैदानावर टिकू शकला नाही. अवघी टीम 83 रन्सवर आऊट झाली. भारताने 15.03 ओव्हरमध्ये 85 रन्स करत मॅच खिश्यात घातली. भारताचा हा आशिया कपमध्ये सलग दुसरा विजय आहे.

संपूर्ण स्कोअर कार्ड पाहा इथं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2016 10:50 PM IST

ताज्या बातम्या