कोण लगावणार विजयी 'षटकार'?,आज भारत-पाक 'रण'संग्राम

  कोण लगावणार विजयी 'षटकार'?,आज भारत-पाक 'रण'संग्राम

  • Share this:

indvspak27 फेब्रुवारी : भारत पाकिस्तान मुकाबला म्हटलं तर जणू दुसरं युद्धचं...आज पुन्हा एकदा आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये महासंग्राम रंगणार आहे. वर्ल्डकप पुर्वी दोन्ही टीम पहिल्यांदाच आशिया कपमध्ये भिडणार आहेत. आशियाकपमध्ये भारताने पाकविरोधात पाच वेळा विजय मिळवलाय. आणि पाकनेही पाच सामने जिंकले आहे. त्यामुळे आज कोण विजयी षटकार लगावणार हे पाहण्याचं ठरेल.

बांगलादेशविरुद्धच्या विजायनंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलाय. रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना अशी बॅटिंग लाईन-अप भारताकडे आहे. तर दुसरीकडे शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळणार्‍या पाकिस्तानकडे जबरदस्त बॉलिंग आहे. कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीच्या खेळण्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. आतापर्यंत आशिया कपमध्ये भारत आणि पाकमध्ये 11 सामने झाले. यात 5 सामने भारताने जिंकले आहे तर 5 सामने पाकने जिंकले आहे. तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. वर्ल्डकपमध्ये सहा सामने झाले आणि सहाही सामने भारताने जिंकले आहे. तर टी-20 वर्ल्डकपमध्येही भारताने 4 सामने जिंकून पाकला धोबीपछाड दिलाय. त्यामुळे आज आशिया कपमध्ये विजयाचा षटकार कोण लगावणार याकडे दोन्ही देशाचं लक्ष्य लागलंय.

दरम्यान, आज भारत पाकिस्तान दरम्यान खेळल्या जाणार्‍या सामन्या बद्दल क्रिकेट रसिकांमध्ये मोठी उत्सकता आहे. मागील काही दिवसांपासून सीमेवर भारत-पाक दरम्यान सारखे खटके उड़त असल्याने आणि देशात काही ठिकाणी दिल्या गेलेल्या देश- विरोधी घोषणांमुळे निर्माण झालेल्या तनावग्रस्त परिस्थितच्या पार्श्वभूमीवर,आज खेळला जाणारा सामना अधिक रोमांचकारी होईल यात शंका नाही, आणि म्हणून नेहमी प्रमाणे पाकिस्तानला हरवत आजचा सामनाही भारतानेच जिंकावा अशी आशा चाहत्यांनी बोलून दाखवलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2016 04:46 PM IST

ताज्या बातम्या