संजय दत्तची कारागृहातून सुटका नियमानुसारच -राम शिंदे

संजय दत्तची कारागृहातून सुटका नियमानुसारच -राम शिंदे

  • Share this:

ramshindeअहमदनगर - 26 फेब्रुवारी : अभिनेता संजय दत्तची कारागृहातून सुटका नियमानुसारच झाली असून त्याला कोणतीही व्हीआयपी ट्रिटमेंट दिली नसल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलं. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

संजय दत्त हा सेलिब्रिटी असल्यानं सर्व कायदेशीर बाबी पडताळून पहिल्यायत. सर्व बाबी नियमानुसार झाल्या असून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पोलिसांवरचे हल्ले सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. पोलिसांवर हल्ला करणार्‍यावर कठोर कारवाई करू, असंही त्यांनी म्हटलंय. तर पानगाव प्रकरणी कालपर्यंत 19 जण अटक करण्यात आलीय. काहीजण राजकारण करुन धर्मात तेड वाढवत असल्याचा आरोपही शिंदेंनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 26, 2016, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading