पालघर विषबाधा प्रकरणी इस्कॉनवर पोषण आहारात हलगर्जीपणाचा ठपका

  • Share this:

palghar32पालघर - 26 फेब्रुवारी : विक्रमगड कासा इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या 247 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती या प्रकरणी  पोषण आहारात हलगर्जीपणाचा ठपका  इस्काॅन संस्थेवर ठेवण्यात आलाय.

विक्रमगड कासा इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या 247 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली होती. यात 17 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर होती. आता या मुलांची प्रकृती ठिक आहे. जेवणातून मुलांना विषबाधा झाल्याने त्यांचे पालक संतप्त आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांना कासा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. आता सध्या 102 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. बाकीच्यांना घरी पाठवण्यात आलंय. उरलेल्या 102 विद्यार्थ्यांचीही वैद्यकीय तपासणी घेऊन सोडण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे. आता आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 26, 2016, 5:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading