News18 Lokmat

'महाराष्ट्र रजनी’ आग प्रकरणी विझक्राफ्ट कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2016 11:13 AM IST

'महाराष्ट्र रजनी’ आग प्रकरणी विझक्राफ्ट कंपनीविरोधात गुन्हा दाखल

fire_at_make_in_india_18

मुंबई - 26 फेबु्रवारी :  गिरगाव चौपाटीवर 'मेक इन इंडिया' सप्ताहाअंर्गत 'महाराष्ट्र रजनी' कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी विझक्राफ्ट' कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारीला गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनीच्या सेटवर लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला होता. याप्रकरणी डी बी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप विझक्राफ्टवर ठेवण्यात आला आहे.

'मेक इन इंडिया' सप्ताहांतर्गत 14 फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटीवर 'महाराष्ट्र रजनी'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अभिनेत्री पूजा सवंत हीचा नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना, स्टेजखालून अचानक आगीचा भडका उडाला. यावेळी या कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिससेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यावर उपस्थित होते. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत, ही आग विझविली. मात्र, यात कोट्यवधी रुपयांचे सामान जळून खाक झाले. या आगीमागे षड्यंत्र असल्याचे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

या प्रकरणी इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आलं असून पालिकेने हा अहवाल पोलिसांकडे सादर केला आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही आग भडकल्याचे प्राथमिक तपासानंतर नमूद करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या स्थळी असलेली सदोष विद्युत यंत्रणा आणि उपकरणं, तसंच स्टेजखालील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला. तसंच, धोक्याची पूर्वसूचना आयोजकांना देऊनही, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालात ठेवण्यात आला होता.

दरम्यान, या मेक इन इंडिया आग प्रकरणात राज्य सरकार या स्टेजचे दिग्दर्शक नितीन देसाई यांना वाचवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2016 10:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...