जैन इरीगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांचं निधन

जैन इरीगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांचं निधन

  • Share this:

मुंबई - 25 फेब्रुवारी : जैन इरीगेशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती भवरलाल जैन यांचं निधन झालंय. ते 79 व्या वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अवयव निकामी झाल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जैन इरीगेशनच्या माध्यमातून त्यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग होता.

bhavarlal jainजैन इरीगेशन या देशातील क्रमांक 1 च्या कंपनीचे चेअरमन भवरलाल जैन यांचं निधन झालंय. ड्रीप इरीगेशन,मायक्रो इरीगेशन,

फूड प्रोसेसिंग डिव्हीजन यासह प्लास्टिक पार्कची निर्मिती करणार्‍या भवरलाल जैन यांनी घरगुती आणि औद्योगिक सोलर उत्पादनात आपल्या देशात क्रांती केली. आपल्या शेतीप्रधान देशात शेतकर्‍याचं उत्पन्न वाढण्यासाठी फळ आणि कांद्याच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनं शेतकर्‍याला हमीभाव मिळवून दिला.

भवरलाल जैन यांचा विद्यार्थी ते उद्योगपती हा प्रवास म्हणजे बुद्धिमत्ता आणि मेहनत यांचाच संगम म्हणावा लागेल. रॉकेलचा व्यवसाय करीत असतानाच भवरलाल जैन यांनी प्रशासकीय परीक्षा दिली होती. सरकारी नोकरी हातात असताना त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयानंच त्यांचं आयुष्य बदललं. शेती आणि शेतकरी डोळ्यापुढे ठेऊन अवघ्या 10 हजार भांडवलावर सुरू झालेला या व्यवसायाचं आता 3 हजार कोटीच्या उद्योगसमुहात रुपांतर झालंय.

21 व्या शतकातील जग बदलणार्‍या जगातील 50 कंपनीतील एक म्हणून भवरलाल जैन यांच्या जैन इरीगेशनचा गौरव फॉर्च्यूननं केला. आज जगातील 179 देशात जैन इरीगेशनची उत्पादनं विकली जातात. अमेरीकेतील नानदान या प्रख्यात कंपनीसह मायक्रो इरीगेशनमधील 6 कंपन्यांची मालकी आज जैन इरीगेशनकडे आहे. भारत सरकारनंही पद्मश्री प्रदान करुन जैन यांचा गौरव केलाय.

पद्मश्री मिळाल्यानंतर भवरलाल जैन यांनी आपल्या उत्पन्नातील 65 टक्के रक्कमेचा एक ट्रस्ट तयार केला आणि ही सर्व रक्कम समाजातील गरजूंसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 22 वर्षांपूर्वी थॉमस मशीन्स या स्वीस कंपनीकडून तंत्रज्ञान घेऊन जैन यांनी व्यवसाय सुरू केला होता. पण 8 वर्षांपूर्वी ही कंपनीही जैन इरीगेशननं विकत घेतली. आणि अत्यंत वाजवी किंमतीत देशातील शेतकर्‍यांना प्रिसीजन टूल्स उपलब्ध करुन दिले.

पावसाचं येणारं पाणी कमी झालंय. धरणातील पाणीसाठ्यात होणारी घट,अशा परीस्थितीत शेती जगवायची असेल तर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करण्यासाठी जैन इरीगेशननं विकसित केलेल्या मायक्रो इरीगेशन अर्थात ठिबक सिंचननं शेती तर जगवलीच पण

शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करुन दिली.

महाराष्ट्र सरकारसह उभारलेल्या 2 प्रकल्पांमुळे सबसीडीचा आधारही शेतकर्‍याला मिळवून देण्यातील कल्पकतेचे जनक म्हणून भवरलाल जैन यांचा उल्लेख केला जातो. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात गांधी तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जळगावला ऊभारलेलं गांधी तीर्थ म्हणजे जगभरातील गांधी साहित्याचा अभ्यास करणार्‍यासाठीचा मोठा खजीनाच. आज जगातील 6 देशात जैन इरीगेशनचं उत्पादन होत असलं तरी खान्देशातील जळगाव हाच त्यांचं मुख्यालय कधीच बदललं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 25, 2016, 5:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading